शिवसेनेचे कार्य घराघरांमध्ये पोहोचवा : राजू यादव

उचगाव (ता करवीर) येथील छत्रपती शिवाजी महाराजनगरमध्ये शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव. शेजारी सुजित चव्हाण, दीपक पाटील व मान्यवर.

उचगाव: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसैनिकांनी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कार्य घराघरात पोचवावे, असे मत करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी व्यक्त केले.

उचगावपैकी छत्रपती शिवाजी महाराज नगर (मनेरमळा) येथील शिवसेनेच्या शाखेचे उद्घाटन व मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण होते.छत्रपती शिवाजीनगर येथील मूलभूत सुविधांसाठी शिवसैनिकांनी प्रशासनाशी संघर्ष करावा, असे आवाहनही राजू यादव यांनी केले.

शिवसेना फलकाचे उद्घाटन उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी केले. उपतालुका प्रमुख दीपक पाटील, पोपट दांगट, दीपक रेडेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, महादेव चव्हाण, विराग करी, विनायक जाधव, संतोष चौगुले, सागर पाटील, सचिन नागटिळक, प्रफुल्ल घोरपडे, महिला आघाडीच्या गीतांजली गायकवाड, उमा धनवडे, रूपाली पाटील, दिनेश संकपाळ, सुरज इंगवले, सुनील पारपाणी, गौरव धनवडे, बबलू देसाई, आकाश समुद्रे, निखिल कदम, पंकजा शिंदे, रमेश भागोजी, पांडुरंग बोडके, मंगेश पाटील, सुशांत पाटील तसेच हिंदवी तालीम व शिवसेना शाखेतील शाखाप्रमुख मंगेश बसवंत, उपशाखाप्रमुख सुनील पाटील, दिनेश कोकाटे, संग्राम इंदुलकर, संभाजी घोलप, योगेश घोलप, प्रशांत पाटील, महेश पाटील, पवन पाटील, प्रशांत ढेरे, अक्षय गुरव, गणेश दिवेकर, संकेत वीर, शाहिद शेख, रवी पोर्लेकर आदी शिवसैनिक व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.