संभाजीराजेंच्या उपोषणाला खुपिरे व शिंदेवाडी ग्रामपंचायती चा जाहीर पाठिंबा

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबई येथे आझाद मैदानावर खा. संभाजीराजे २६ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या उपोषणाला करवीर तालुक्यातील खुपिरे व शिंदेवाडी ग्रामपंचायती च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

खुपीरे व शिंदेवाडी ग्रामपंचायती च्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की खा.संभाजीराजे हे २६ फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत त्यांना दोन्ही ग्रामपंचायती च्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.

या पत्रकावर खुपिरे ग्रामपंचायती चे सरपंच दिपाली जांभळे उपसरपंच युवराज पाटील तसेच शिंदे वाडी च्या सरपंच रंजना पाटील व उपसरपंच संदीप पाटील यांच्या सह्या आहेत.