कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीन अंबाबाईची ५१ किलो वजनाची मूर्ती देवस्थान समितीकडे होणार सुपूर्त

कोल्हापूर: कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कडे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ची ५१ किलो वजनाची मूर्ती १ मार्च रोजी सूपूर्द केली जाणार असल्याची माहिती अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले की करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मूळ मूर्ती ची अभिषेकामुळे झीज होते त्यामुळे सराफ व्यापारी संघाच्या वतीने चांदीची मूर्ती देण्यात येणार आहे. १ मार्च रोजी विधिवत ही चांदीची मूर्ती देवस्थान समिती कडे सूपूर्द केली जाणार आहे ‌या वेळी महालक्ष्मी मंदिर परिसरात भ्रम शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या वेळी नागरिक तालीम मंडळे संघटनांनी सहभागी व्हावे असे आवाहन गायकवाड यांनी केले.यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड सचिव अनिल पोतदार संजय जैन संचालक सुहास जाधव सुरेश गायकवाड सुरेंद्र पुरवंत आदी मान्यवर उपस्थित होते.