पोलिस आयुक्त अमिताभ गुप्तांचा ‘रूद्रावतार’

पुणे :पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात कुठेही अवैध धंद्ये चालु देऊ नका. तसेच दारू धंदे आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल असं यापुर्वीच बैठकीत स्पष्ट केलं होतं. दरम्यान, मंगळवारी मुंढवा पोलिस ठाण्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्यात आली.

त्यामुळे पोलिस आयुक्तांनी मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना 7 दिवसांसाठी शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केलं आहे.मुुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत भिमनगर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार खेळताना ४ लोक सापडली. तर दुसरी कारवाई मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडीगांव येथील भाजी मार्केटमधील रिकाम्या गाळ्यामध्ये करण्यात आली. तेथे दोन लोक जुगार खेळताना आढळून आले.

शहरात कोठेही अवैध धंद्ये सुरू असलेले खपवुन घेतले जाणार नाही हे आयुक्त अमिताभ गुप्ता आणि सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी यापुर्वीच स्पष्ट केले होते.पोलिस आयुक्तांनी बुधवारी सायंकाळी आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकास शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.शहरातील सेक्शन गरम पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 2 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना त्यांच्या हद्दीत अवैध धंद्ये सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने शहर नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत..