राणादा’ च्या पाठक बाईंची पर्स चोरीला

पुणे : पर्स, पाकिट, मोबाईल चोरी होण्याचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला अधूनमधून येत असतो. मात्र, चोरट्यांच्या तावडीतून सेलिब्रिटीही सुटत नाहीत. कोल्हापूरकरांचा लाडका राणादाच्या लाडक्या पाठक बाईंनाही. चोरट्यांनी हात दाखवला आहे. पुण्यात त्यांच्या पर्सची चोरी झाली आहे.

‘तुझ्यात जीव रंगला’ या कोल्हापुरात चित्रीत झालेल्या आणि या मालिकेतील कोल्हापुरी मातीतील पैलवान राणादा आणि पाठक बाई म्हणजे घररघरात पोहोचले आहेत. यातील अंजली उर्फ पाठक बाई म्हणजेच अक्षया देवधर ही मुळची पुण्याची. या मालिकेमुळे अक्षया लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

पुण्यातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेली असता अक्षयाच्या दुचाकीच्या डिकीतील पर्स चोरट्यांनी लंपास केली. त्यात सुमारे ५ ते ६ हजार रुपये होते.अक्षता आणि तिची मैत्रिण बुधवारी सकाळी पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील एका हॉटेलात नाष्ट्यासाठी गेल्या होत्या. अक्षयाने पर्स मैत्रिणीच्या गाडीच्या डिकीमध्ये ठेवली होती. तेथून त्या नाष्टा करण्यासाठी गेल्या. नाष्टा करुन पुन्हा त्या गाडीजवळ आल्या. गाडीची डिकी उघडून पाहिले असता डिकीतील साहित्य अस्ताव्यस्त झाले होते. त्यामुळे पर्सची चोरी झाल्याचे लक्षात आले. पर्समध्ये सुमारे ५-६ हजार रुपये असल्याचे अक्षयाने सांगितले.