जि. प. सदस्य भगवान पाटील यांच्या कवितेला सभागृहाने दिली ” दाद “

कोल्हापूर (सुरेश पाटील): जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा म्हणजे प्रशासनाच्या कामकाजावर वारेमाप आरोप, भ्रष्टाचाराची लक्तरे, चुकीच्या गोष्टींचा पंचनामा आदी विषयांचा खरपूस समाचार घेणार नाहीत ते कसले जि. प. सदस्य. चांगल्या कामाचं कौतुक, तर चुकीच्या कामाचा सातबारा काढल्याशिवाय सदस्य स्वस्थ बसत नाहीत.

आज (मंगळवारी) झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर जोरदार चर्चा झाली. आजची सर्वसाधारण सभा शेवटची असल्याने या सभेत जुन्या कामाचा लेखाजोखा झाला. काही सदस्यांनी गेल्या पाच वर्षातील चांगल्या कामाचं कौतुक केलं तर चुकीच्या कामावर बोट ठेवत अधिकाऱ्यांना दम दिला. मात्र आज झालेल्या सर्वसाधारण सभेत जि. प. सदस्य भगवान पाटील यांनी भ्रष्टाचारातील एका विषयावरील सभागृहाला चक्क एक कविताच ऐकवली. ती कविता अशी आहे.

” मॅटची कुस्ती “वर्षामागून वर्ष सरतीकिस्से तिचे ओठावरती कशी जुंपली कुणास ठाऊक? अर्थ दडलेली मॅटची कुस्ती

।। फराकटेंनी फटकारले अन् राजवर्धनही संतापले.आवेशाने भोजे कडाडले उतरवू तुमची मस्ती ॥ सुभाष उठले, हसत वदले अहो आम्ही सातपूते स्वप्न घेऊनी शाळा येती जरा जाणा त्यांची भक्ती ! | अखेर बोरगेंच्या विजयाने उघडली नस्ती.हिशेब द्या नारा मुखीअशी रंगली मॅटची कुस्ती.

सभागृहातील उपस्थित सदस्यांनी पाटील यांची कविता ऐकताच टाळ्या वाजून त्याला चांगला प्रतिसाद दिला. या कवितेने अधिकाऱ्यांच्या तोंडावरील हसू ही लपू शकले नाही. सभा संपल्यानंतर भगवान पाटील यांच्या कवितेचे कौतुक आणि चर्चा सदस्यांमध्ये सुरू होती.