बहिरेश्वर : करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे बुधवार दिनांक 23 फेब्रुवारीपासून जिल्हा व शहर तालीम संघाच्या मान्यतेने भव्य राज्यस्तरीय मॅटवरील आमदार केसरी व तुळशी केसरी स्पर्धेला प्रारंभ होणार असल्याची माहिती तुळशी सहकार समूहाचे नेते व माजी उपसरपंच सरदार पाटील ,मुंबई कामगार केसरी पैलवान नितीन पाटील यांनी दिली.
मोबाईलच्या अतिवापरामुळे सध्याची तरुणाई मैदानी खेळ विसरून गेले आहेत शिवाय कोल्हापूर म्हटलं की रांगडी भाषा आणि तांबड्या मातीतील पैलवानकी व कूस्ती खेळ जिवंत ठेवण्यासाठी तुळशी सहकार समूहाच्या वतीने भव्य दिव्य मॅटवरील कुस्ती चे आयोजन केले आहे .कोरोनाचे सर्व नियम पाळत ही स्पर्धा घेणार असल्याचं उपसरपंच सरदार पाटील यांनी सांगितले .या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद चे अध्यक्ष राहुल पाटील ,गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील ,मार्केट कमिटीचे माजी उपसभापती शामराव सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते मॅटपूजन व स्पर्धेस प्रारंभ होणार आहे .
सदर स्पर्धा 30,35,40,45,50 55 किलो वजनी गटात ,ओपन गट 84 किलो पर्यंत होत असून, बक्षीस वितरण समारंभ 25 फेब्रुवारी रोजी आमदार पी एन पाटील ,गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील ,गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे ,पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी ,जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते, यशवंत बँकेचे चेअरमन एकनाथ पाटील, संचालक प्रकाश देसाई ,डॉक्टर के.एन पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना रोख रक्कम व चषक तसेच ओपन गटातील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या रोख रक्कम आमदार केसरी व तुळशी केसरी चांदीची गदा प्रदान करण्यात येणार आहे तरी पंचक्रोशीतील पैलवानांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंबई कामगार केसरी नितीन पाटील यांनी केले आहे..