साखरेच्या गळीत हंगामात कोल्हापूर सांगली अव्वल

कोल्हापूर: साखरेच्या गळीत हंगामाचा सध्या उत्तरार्ध सुरू झाला आहे. राज्यात 837 लाख टन, तर सांगली आणि कोल्हापूर जिह्यात 197 लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

राज्यात अजूनही सुमारे 350 लाख टन आणि कोल्हापूर विभागात 75 लाख टन उसाचे गाळप होणे बाकी आहेसाखर उताऱयात कोल्हापूर, सांगली अव्वल असून, 11.62 टक्के उतारा मिळाला आहे. राज्याचा सरासरी उतारा 10.18 टक्के इतका आहे.यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याच्या दरम्यान गळीत हंगामास सुरुवात झाली. राज्यात 197 कारखान्यांनी धुरांडी पेटवली. मागली वर्षी 187 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला होता. परतीच्या पावसामुळे यंदाचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरनंतर पूर्ण क्षमतेने सुरू झाला. एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत राज्यात 1150 लाख टन, तर कोल्हापूर विभागात सुमारे 250 लाख टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. 14 फेब्रुवारीपर्यंत 837.37 लाख टन उसाचे गाळप होऊन 852.75 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन राज्यात झाले आहे.