वाइन विक्री निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

मुंबई – राज्य सरकारच्या सुपर मार्केट तसेच वॉक इन स्टोअरमधून वाइनविक्रीची परवानगी दिल्याच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता न्यायालयामध्ये सरकारच्या या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

सरकारचा निर्णय व्यसनमुक्ती धोरणाविरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे.याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सुपर मार्केट आणि दुकानांमध्ये वाइन विक्रीला या निर्णयानुसार परवानगी देण्यात आली होती. उच्च न्यायालयात राज्य सरकारच्या आदेशाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देताना सरकारचा हा निर्णय व्यसनमुक्ती धोरण स्वीकारणाऱ्या ऑगस्ट २०११ च्या सरकारी ठरावाच्या विरोधात असल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला आहे. ही याचिका सामाजिक कार्यकर्ते असणाऱ्या संदीप कुसाळकर यांनी दाखल केली आहे.