गोड साखर बाबत श्रीपतराव शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल!

गडहिंग्लज : गडहिंग्लज साखर कारखाना सध्या काही ना काही कारणाने सध्या चर्चेत आहे. आज कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत चेअमन श्रीपतराव शिंदे यांनी विरोधकांच्या वर हल्लाबोल केला.

या मध्ये आम्ही कारखाना चालू करण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होतो.पण आमचे विरोधक हा कारखाना बंद कसा राहील याचा प्रयत्न करत होते. सध्या सोशल मीडियावर कारखान्याच्या वजन काट्याचा खोटा फोटो व्हायरल झाला आहे.त्याचा आणि कारखान्याचा काहीही संबंध नाही.

तसेच असे गैरसमज पसरवले जात आहेत. तसेच याची गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. तसेच ग ग्रामविकास मंत्री ना.मुश्रीफ यांनी कारखान्याच्या मदतीसाठी आम्ही भेटलोच नाही असे पत्रकारांना धांदात खोटे सांगितले. पण आम्ही कागल येथील शासकीय विश्रामगृहात माझ्या सह अमर चव्हाण,कृष्णा परीट,उदय कदम आदी संचालक भेटण्यासाठी गेलो होतो पण ना.मुश्रीफ यांनी आम्हाला सतीश पाटील यांना भेटण्याचा सल्ला दिला.कारखाना चालू करण्यासाठी आम्हाला मदत केली नाही. त्याच बरोबर कारखान्याच्या बॉयलरचे नुकसान कोणी केले ? पाच दिवस कारखाना बंद राहिला,खोटा फोटो कोणी व्हायरल केला ? याची सखोल चौकशी करावी अशी मागणी चेअमन श्रीपतराव शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली या पत्रकार परिषदेला अमर चव्हाण,संभाजी नाईक, बाळकृष्ण परीट आदी संचालक उपस्थित होते.