इलेक्ट्रॉनिक मोटार “ओला” सायकलचे सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात लॉन्चिंग

कोल्हापूर: जिल्ह्यात इलेक्ट्रिक वाहनांना चालना मिळावी यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.आज ओला कंपनीच्या इलेक्ट्रिक मोटार सायकलचे सतेज पाटील यांच्या हस्ते कोल्हापुरात लॉन्चिंग झाले.

कोल्हापुरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढली आहे.ओला कंपनीच्या गाड्या ऑनलाईन पद्धतीनं सर्वात जास्त कोल्हापुरात बुक झाल्या आहेत. त्यामुळे या गाड्यांचे कोल्हापुरात पहिल्यांदा लॉन्चिग करण्यात आले. वाहनांच्या संख्येबरोबर या वाहनांचे पार्ट्स तयार करण्याचं कोल्हापूर हे Hub बनावे अशी तयारी सतेज पाटील यांनी केली आहे. लॉन्चिंग झाल्यानंतर सतेज पाटील यांनी स्वत: इलेक्ट्रीक गाडी चालवली.