एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

एमपीएससी विद्यार्थ्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या महामारीत राज्यातील भरती प्रक्रिया थांबवण्यात आली होती.या दरम्यान आता MPSC परिक्षेसाठीची वयोमर्यादा ओलांडणाऱ्या हजारो उमेदवारांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना 31 डिसेंबर 2021 पर्यंत ज्या विभागाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होतील, अशा परीक्षेला विशेष बाब म्हणून एकवेळ बसण्याची संधी मिळणार आहे.

त्यासाठी आता वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधीत कमाल वयोमर्यादा ओलांडणाऱ्या उमेदवारांकरीता अर्ज सादर करण्याकरिता वेबलिंक सुरू करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली. अशा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत. दरम्यान हे अर्ज करण्याचा अंतिम तारिख 9 फेब्रुवारी 2022 असणार आहे. याबाबत माहिती MPSC ने आपल्या ट्विटरवरुन दिली आहे.