दुर्धर कँन्सर रुग्णासाठी कोल्हापूरात सांजवात सेवाश्रम अनोखा प्रकल्प

कोल्हापूर: कँन्सर आजार जेंव्हा वैद्यकशास्त्राच्या मर्यादे पलिकडे जाते अशा.रूग्णाचे उर्वरीत आयुष्यकमी वेदनादायक व्हावे यासाठी सांजवात आश्रम हा महत्त्वपूर्ण प्रकल्प कोल्हापूरात सुरू करण्यात येत आहे अशी माहिती कोल्हापूर कँन्सरचे डाँ.सुरज पवार यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली. तज्ञ डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांचे मदतीने हा प्रकल्प कार्यरत राहणार आहे.

कोल्हापूर कँन्सरचे संस्थापक अधयक्ष कै.भास्कर पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी व जागतिक कँन्सरदिनी म्हणजेच उद्या ४ फेब्रुवारी रोजी गोकुळ शिरगाव येथे या प्रकल्पाचा कोनशिला समारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.अशा प्रकल्पाची देशात नितांत गरज आहे..पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यादाच असा प्रकल्प होत आहे.अशी माहिती डाँ.सुरज पवार व डॉ. संदिप पाटील यांनी दिली.या पत्रकार परिषदेस डॉ. रेश्मा पवार, डॉ. योगेश अनाप,डॉ. पराग वाटवे उपस्थित होते.