स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न साकार करणारा अर्थसंकल्प : धनंजय महाडिक

कोल्हापूर : संसदेत सादर केलेला आजचा अर्थसंकल्प संपूर्ण देशाला आणि राज्याच्या विकासाला बळकटी देणारा आहे. नव्या स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या अर्थसंकल्पाचे सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे.

सर्वच क्षेत्राला ऊर्जा देणारा आणि न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली.शेतकर्‍यांच्या कृषी उत्पादनाला किमान हमीभाव, रस्ते बांधणी, रोजगार निर्मिती, देशाच्या लष्करी सामर्थ्याला पुरक धोरण, पायाभूत सेवासुविधा, आरोग्य यंत्रणेचं बळकटीकरण, डिजिटल शिक्षणाला चालना, ई-पासपोर्ट धोरण, सहकार क्षेत्राला दिलासा, इथेनॉल निर्मितीला वेग, राज्यांच्या विकासासाठी १ लाख कोटींचा निधी ही अर्थसंकल्पाची वैशिष्टय आहेत. देशाच्या प्रगतीसाठी अत्यंत सकारात्मक असा अर्थसंकल्प असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारत अस्तित्वात येण्यासाठी पुरक आहे, असे महाडिक यांनी म्हटले आहे.