राजाभाऊ भेलच्या मालकावर प्राणघातक हल्ला….हल्लेखोर ताब्यात

कोल्हापूर : येथील प्रसिद्ध राजाभाऊ भेलचे मालक बापू शिंंदे यांच्यावर आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास प्राणघातक हल्ला काही अज्ञातांनी केला .हल्लेखोरांमधील दोघांना नागरिकांनी घटनास्थळी पकडून बेदम चोप दिला.

हल्लेखोरांचा एक साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. याघटनेची नोंद जुनाराजवाडा पोलिसात झाली आहे. राजाभाऊ भेल चे मालक रवींद्र उर्फ बापू शिंदे राहणार मंगळवार पेठ यांनीशाहू मैदान चौकात एका गाळयात भेलचे दुकान सुरू केले आहे.मंगळवारी रात्री या स्टॉल वर काही अज्ञात भेल खाण्यासाठी आले होते यावेळी समोरील कट्टयावर बसून भेल खाताना त्यांनी शस्त्रे दाखवली त्यांनी 3-4 दिवसांपूर्वी येथे येऊन दुकानावर दगड मारला होता.आज दुपारी चारच्या सुमारास यामधील एक संशयित दोन साथीदारांसह स्टॉल वर आला त्यांनी भेल मागितली कर्मचाऱ्यांनी भेलही दिली.यादरम्यान एकजण पानखाऊन स्टॉल समोरच थुंकला कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या कृत्याबद्दल जाब विचारला असता त्यामधील एकाने शस्त्रे काढून शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न केला शिंदे यांनी त्यामधील एकाला ढकलून दिले शेजारचे नागरिकही मदतीसाठी धावून आले नागरिकांनी दोघांना पकडून चोप दिला मात्र या वेळी एक जण पळून जाण्यात यशस्वी ठरला या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिसात झाली आहे.