नाशिक – नाशिक मध्ये घरातील बाथरूमच्या गॅस गिझर मधून गॅस गळती झाल्याने 22 वर्षीय तरुणीचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. जेलरोड परिसरात ही घटना घडली आहे.
या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, साक्षी अनिल जाधव (22 वर्ष) असे या मृत तरुणीचे नाव आहे. साक्षी आपल्या परिवारासोबत जेलरोड येथील श्री संकुल अपार्टमेंट येथे राहत होती. ती एमएचं शिक्षण घेत होती. साक्षी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली असता गिझरच्या गॅसची गळती झाल्याने गॅस सर्वत्र पसरला. साक्षीच्या लक्षात येण्याच्या पुर्वी गॅस तिच्या नाका, तोंडात गेला.यामुळे साक्षी बाथरुमध्ये बेशद्ध पडली होती. बराच वेळ बाहेर आली नसल्याने घरच्यांनी बाथरूमचा दरवाजा तोडला. तेव्हा साक्षी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.