शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्दा तापला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागप्रमुखपदावरील नियुक्तीचा मुद्दा सध्या तापला आहे.या विभागातील दोन प्राध्यापकांनी आपली विभागप्रमुखपदी नियुक्ती व्हावी यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.

त्यातील वरिष्ठ प्राध्यापक जी. बी. कोळेकर यांनी आत्मदहनाचा इशारा रविवारी दिला आहे.रसायनशास्त्र अधिविभागप्रमुखपदावर सध्या कार्यरत असणारे प्रा. जी. एस. गोकावी आज, सोमवारी सेवानिवृत्त होत आहेत. विद्यापीठाच्या प्रचलित पद्धती आणि रसायनशास्त्र अधिविभागातील सेवाज्येष्ठतेनुसार दि. १ फेब्रुवारीपासून अधिविभागप्रमुखपदावर माझी नियुक्ती होणे अपेक्षित आहे.मला जर या पदावर नियुक्त केले नाही, तर हा माझ्यासाठी प्रचंड मोठा धक्का असेल. मला आत्मदहन करण्यापासून काहीही पर्याय राहणार नाही. माझ्या या मानसिक स्थितीस आपण जबाबदार असाल, अशा उल्लेखाचा ई-मेल या विभागातील वरिष्ठ प्राध्यापक जी. बी. कोळेकर यांनी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांना पाठविला आहे.