केडीसीसी बँकेकडून पगारदार विमा योजनेतून मृतांच्या वारसांना ३० लाखाचा धनादेश…….

कोल्हापूर -केडीसीसी बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते श्रीमती माधुरी पाटील यांना ३० लाखांचा विमासुरक्षा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, आमदार राजेश पाटील, माजी आमदार अमल महाडिक व इतर प्रमुख.

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पगारदारासाठीच्या अपघाती विमा योजनेतून मृताच्या वारसदारांना ३० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला

संचालक मंडळाच्या बैठकीत बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कै. मल्लापा रामू पाटील – रा. सुरूते ता. चंदगड यांच्या पत्नी श्रीमती माधुरी यांना हा धनादेश देण्यात आला.       

याबाबत अधिक माहिती अशी, सुरूते ता. चंदगड  येथील मल्लापा रामू पाटील या माध्यमिक शिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला होता. केडीसीसी बँकेकडे पगार जमा होणाऱ्या १७ हजार नोकरदारांसाठी  दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी च्या सहयोगातून अवघ्या ३०० रुपयांच्या हप्त्यामध्ये तीस लाखाची विमासुरक्षा देणारी योजना सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षक, व्याख्याते, कारखाना कर्मचारी, बँक इत्यादी पगारदार खातेदारांना या योजनेची अत्यल्प हप्त्यामध्ये ही सुविधा सुरू झाली आहे.     

यावेळी अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे,आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ श्रीमती निवेदिता माने, माजी आमदार अमल महाडिक, ए. वाय. पाटील, प्रताप उर्फ भैय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, सुधिर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, सौ. श्रुतिका काटकर, सौ स्मिता गवळी आदी संचालक उपस्थित होते.