शेतकऱ्यांनी शेतीपंप विजबिल दुरूस्ती कॅम्पचा लाभ घ्या : आ. प्रकाश आबिटकर

गारगोटी : आमदार प्रकाश आबिटकर यांनी थकबाकीदार शेतकरी व ज्या ग्राहकांनी विजबिले भरले नाही अशा ग्राहकांची तोडणी करू नये याकरीता महावितरण विभागाचे मुख्य अभियंता यांचेसमवेत आयोजित बैठकीमध्ये केलेल्या मागणीनुसार राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विजबिले दुरूस्तीकरीता कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून सदर कॅम्पचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महावितरण कंपनी कडून सक्तीने विजबिल वसूली सुरू आहे. परंतू काही शेतकऱ्यांनी अद्याप विज मिटर मिळालेले नाही. तसेच प्रत्यक्ष विज जोडणी करण्यात आलेली नसताना देखील शेतकऱ्यांना हॉर्स पॉवर प्रमाणे विज बिले देण्यात येत आहेत. तसेच कोणतीही पुर्व कल्पना न देता महावितरणचे कर्मचारी शेतकऱ्यांची विज तोडणी करण्याचे काम सुरू असून हे चुकीचे आहे. आपला शेतकरी प्रामाणिक व कष्टकरी असल्यानेच ते नियमित विजबिल भरतात परंतू ज्या शेतकऱ्यांची वाढीव विजबिले आली आहेत त्यांची विजबिल दुरूस्ती करण्याबाबतच्या सुचना महावितरणचे मुख्य अभियंता श्री.भागवत यांना सुचना करण्यात आल्या होत्या.

त्या बैठकीचे अनुषंगाने कार्यकारी अभियंता ग्रामीण 2, एस. एस. शिंदे यांनी या उपविभागातील राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाढीव विजबिलांची दुरूस्ती करण्याकरीता कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे. या कॅम्प अंतर्गत गारगोटी उपविभागांतर्गत गारगोटी शाखा 1 व 2 दि.31 जानेवारी, 2022 रोजी गारगोटी महावितरण उपविभाग कार्यालय, कूर व मडिलगे शाखा दि.01 फेब्रुवारी, 2022 महावितरण कार्यालय कूर, म्हसवे शाखा दि.02 फेब्रुवारी, 2022 महावितरण कार्यालय म्हसवे, पिंपळगाव शाखा दि.03 फेब्रुवारी, 2022 महावितरण कार्यालय पिंपळगाव, कडगांव व पाटगांव शाखा दि.04 फेब्रुवारी, 2022 महावितरण कार्यालय कडगांव येथे आयोजित केले आहे. तसेच राधानगरी उपविभागांतर्गत राधानगरी शाखा 1, 2 व सोळांकूर दि.31 जानेवारी, 2022 रोजी राधानगरी महावितरण उपविभाग कार्यालय, शिरगांव, तारळे व आवळी बुद्रुक शाखा दि.01 फेब्रुवारी, 2022 महावितरण कार्यालय आवळी बुद्रुक, सरवडे, बिद्री शाखा दि.02 फेब्रुवारी, 2022 महावितरण कार्यालय बिद्री, कसबा वाळवा शाखा दि.03 फेब्रुवारी, 2022 महावितरण कार्यालय कसबा वाळवा येथे आयोजित केले आहे. तसेच आजरा उपविभागांतर्गत आजरा शाखा दि.01 फेब्रुवारी, 2022 महावितरण कार्यालय आजरा व साळगाव शाखा दि.02 फेब्रुवारी, 2022 रोजी महावितरण कार्यालय साळगाव येथे आयोजित केले आहे.