इचलकरंजी/ मन्सूर अत्तार : सुपर मार्केटमध्ये मद्य विक्रीच्या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात भाजपने आंदोलन केले. जोरदार निदर्शने करण्यात आली. महिलांनी राज्य शासनाविरोधात संताप व्यक्त केला.
शासनाने हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा अन्यथा या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. राज्य शासनाने सुपर मार्केटमध्ये मद्य विक्रीचा निर्णय घेतला आहे. या निर्णया विरोधात भाजपने कार्यालयासमोर निदर्शने केली. विविध निषेधाचे लक्षवेधी फलक घेऊन आंदोलकांनी राज्य शासनाविरोधात जोरदार घोषणाबजी केली. सध्या महागाईमुळे जगणे गगनाला भिडले आहेत.
या निर्णयामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होऊन महाराष्ट्र अधोगतीला जाणार आहे. राज्य शासन महिला सबलीकरणासाठी निर्भया पथक नियुक्त करते आणि तेच सरकार दुकानातून दारू विक्रीस परवानगी देत आहे. यामुळे महिलांवरील अत्याचाराच भरच पडणार आहे. राज्य शासनाने याचा विचार करून हा निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अन्यथा या विरोधात तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनात पुनम जाधव, अश्विनी कुबडगे, संगिता साळुंखे, निर्मला मोरे, निता भोसले, योगिता दाभोळे, अनिता कुरणे, वंदना कांबळे, अलका विभुते, सुप्रिया मजले, मधुमती तोरबुले, ऋतुजा विभुते, प्रविण पाटील किसन शिंदे, उमाकांत दाभोळे सुरज पवार यांसह सतोंष कोळी, हेमंत वरुटे, भगवान बरगाले, मनोज तराळे,आरुण कुंभार भारतीय जनता पार्टी व भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला आघाडी इचलकरंजी शहर इ. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.