नाशिक : वातावरणातील बदलामुळे उभ्या पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आगामी हंगामात लागवडीसाठी तयार करण्यात येणाऱ्या कांद्याच्या रोपावरही परिणाम होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झालीच आहे पण ढगाळ वातावरणामुळे बिजोत्पादनासाठीघेतलेल्या डेंगळ्यावर करप्याचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होत आहे पण आगामी हंगामात कांदा लागवड करावी कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. देवळा तालुक्यात अनेक शेतकरी हे कांद्याच्या बिजोत्पादनावर भर देतात. शिवाय घरगुती पातळीवर केलेले बिजोत्पादन हेच चांगले असल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे दर्जेदार कांद्याची निवड करुन त्याची कंड लागवड बियाणे तयार कऱण्यासाठी करतात. मात्र, यंदा या रोपासाठी घेतल्या जात असलेल्या बिजोत्पादनावरच रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे.
करप्याच्या प्रादुर्भावामुळे नुकसानबिजोत्पादनासाठी चांगला कांदा हा मध्यभागी कापून लावला जातो. सध्या यासाठी लावेलेल्या कांद्याची पात, गोंडे येण्यापूर्वीच करपून नष्ट होत आहे. ढगाळ वातावरणामुळे यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव हा वाढत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी थेट डेंगळा कांदा नष्टच करुन टाकला आहे. त्यामुळे रोप लागवडीपैकी पेरणीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच उरणार नाही. परिणामी अधिकचे उत्पादन हे रोपाची लागवड करुन होत असते त्याला मुकावे लागणार आहे.आता कांद्याचीही टंचाईबिजोत्पादन करण्यासाठी चांगल्या कांद्याची आवश्यकता असते. उन्हाळी हाच चांगला कांदा आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वीच कांद्याची विक्री करण्यात आली आहे. शिवाय बिजोत्पादन झाल्याने कांद्याची साठवणूकही शेतकऱ्यांनी केली नाही. मात्र, आता करपा रोगाने नुकसान झाले असून आता नव्याने बिजोत्पादन करावे कसे असा सवाल आहे.