मुरगूड : कागल – मुरगूड रस्त्यावर भडगाव ता. कागल येथे कार आणि दुचाकीमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात एम.आय.डी.सी मध्ये कामावर असणाऱ्या तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला.
वैभव शिवाजी धुरी (वय २५, रा दोनवडे ता.भुदरगड) असे मृत तरुणाचे नाव आहे.अधिक माहिती अशी की, वैभव आज सकाळी एम.आय.डी.सी मधून कामावरून आपल्या दुचाकी (एम एच ०९ ईपी १९१८) वरून घरी जात होता. कागल मुरगूड रस्त्यावर भडगाव फाट्यावर त्याची चारचाकी (एम एच ०९ ए एन १९५४) गाडीशी जोरदार धडक झाली. या धडकेत वैभव च्या डोक्याला जबर मार लागला होता.वैभवच्या डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. तात्काळ त्याला मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.