गोकुळच्या पशुखाद्य वितरण व दूध संकलनाबाबत अध्यक्ष विश्वास पाटील यांचा खुलासा

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : मुडशिंगी येथील दूध संस्थेकडून होत असलेल्या दूध संकलना बाबतीत त्याचबरोबर गोकुळ संघाच्या श्री.महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखान्यातील पशुखाद्य वितरणा बाबतीत गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी एका पत्रकाद्वारे खुलासा केला आहे. अध्यक्ष पाटील यांनी दिलेला पत्रातील खुलासा असा आहे गडमुडशिंगी व पंचतारांकित कागल येथे प्रतिदिन अंदाजे ५०० मे टन पशुखाद्य उत्‍पादन करून संघास दूध पुरवठा करणा-या दूध संस्‍थाना अत्‍यंत वाजवी दरामध्‍ये त्‍यांच्‍या मागणी प्रमाणे पुरवठा करणेत येतो.

उत्‍पादन होणारे पशुखाद्य दूध संस्‍थानी केलेल्‍या मागणी नंतर त्‍यांना वेळेत पोहोच करणेसाठी संघामार्फत पक्‍का माल वाहतूकीचे टेंडर १ जुलै २०२१ ते ३० जून २०२३ या कालावधीसाठी मागविणेत आले होते. त्‍यानुसार आलेल्‍या टेंडर मधून कमीत कमी वाहतूक दर देणारे ठेकेदार श्री.विठ्ठल रखुमाई सहकारी वाहतूक संस्था मुरगुड व शिवराज ट्रान्‍सपोर्ट यांना देणेस संचालक मंडळाच्या 15 जुलै 20 21 च्या बैठकीत मंजुरी देणेत आली आहे.

सदर ठेकेदारांना वाहतूक कामाचा दिलेला ठेक्‍याद्वारे त्‍यांनी ५० वाहनांमार्फत अंदाजे १०,००० मे. टन प्रति महिना पशुखाद्य पोहोच करणेचा करार करणेत आला आहे.

सध्‍या दूध संस्‍थाच्‍या कडून पशुखाद्याच्‍या मागणीमध्‍ये मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्‍यामुळे दूध संस्‍थाना सदर ५० वाहनांमार्फत पशुखाद्य वेळेत पुरवठा करणेमध्‍ये अडचणी निर्माण झालेनंतर सदर ठेकेदारांना पशुखाद्य उत्‍पादन मोठ्या प्रमाणांत होत असून शिल्‍लक साठा राहत असून. वाहतुकीची व्‍यवस्‍था कळविले होते. परंतु त्‍यांचेकडून उत्‍पादित होणा-या सर्व पशुखाद्याची वितरण व्‍यवस्‍था झालेली नाही. त्‍यामुळे त्‍यांचेवर दंडात्‍मक कार्यवाही करणेत आली आहे. तसेच वाहतूक व्‍यवस्‍था सुरळीत करणेसाठी त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली आहे. परंतु त्‍यांचेकडून पुरेशी वितरण व्‍यवस्‍था झालेली नाही.

सध्‍या उत्‍पादन अंदाजे १३,००० मे.टन प्रति महिना उत्‍पादन होत असून दूध संस्‍थाकडून दिवसेंदिवस पशुखाद्याच्‍या मागणीमध्‍ये वाढ होत आहे. परंतु सध्‍या सदर ठेकेदाराच्‍या असलेल्‍या वाहनांमार्फत दूध संस्‍थाना मागणीप्रमाणे तात्‍काळ पशुखाद्य वेळेत पोहोच होत नाही. त्‍यामुळे पशुखाद्य वेळेत मिळत नसलेल्‍या तक्रारीचा विचार करून व्‍यवस्‍थापक (पशुखाद्य) यांनी पशुखाद्य पोहोच करणेसाठी आणखी २५ भाडोत्री वाहनांची व्‍यवस्‍था करून मिळवी अशी संचालक मंडळाकडे मागणी केली होती.

वरील सर्व परिस्थिती माहिती घेवून प्राथमिक दूध संस्‍थाना वेळेत पशुखाद्य पोहोच करणेसाठी संचालक मंडळच्या १५ जानेवारी २०२२ रोजीच्या बैठकीत पशुखाद्य वाहतुकीचा पूर्वानुभव असलेल्‍या संस्थेकडून व ज्‍यांचेकडे एकाच वेळी मागणीप्रमाणे वाहने पुरवठा करणेची क्षमता आहे.

अशा राधानगरी तालुका सहकारी वाहतूक संस्था मर्या., घोटवडे यांचेकडून २५ ट्रक वाहने पुर्वीचे टेंडरमधील मंजूर दरानेच भाड्याने घेणेत आलेले आहेत. या संचालक मंडळाने घेतलेल्‍या निर्णयामुळे दूध संघाचे कोणतेही आर्थिक नुकसान झालेले नाही.उलट या निर्णयामुळे दूध संस्थाना त्यांच्या मागणी प्रमाणे वेळेत व पशुखाद्य पुरवठा होणार असून त्याचा दूध उत्पादकांना फायदा होणार आहे.

तसेच संघाकडे दूध संकलनास परवानगी मिळावी म्‍हणून दूध संस्‍थांची मागणी आलेस ज्‍या त्‍या तालुक्‍यातील संचालकांची शिफारस घेऊन संकलनास परवानगी दिली जाते. सदर कामकाजाची पध्‍दत ही पुर्वी प्रमाणेच आहे. याबाबत मुडशिंगी येथील दूध संस्‍थानी दूध संकलनास परवानगीची मागणी केली होती. त्या तालुक्‍यातील संचालकांची शिफारस घेतले नंतर त्‍यांना दूध संकलनास परवानगी देणेत येणार आहे.दूध उत्पादक, ग्राहकांच्या बळावर व प्रसार माध्यमांच्या सहकार्य मुळेच गोकुळ ने झेप घेतली…

आमचा कारभार सभासदाभिमुख आहे, त्यामुळेच आम्ही स्वता अनेक बाबींची माहिती प्रसार माध्यमानां देतो..महाडिक यांनी प्रसारमाध्यमांबाबत संमभ्र निर्माण करु नये. असे अध्यक्ष पाटील पाटील यांनी दिलेल्या खुलासा पत्रकात म्हटल आहे. मात्र आज( मंगळवारी) गोकुळच्या संचालिका शोमिका महाडिक यांनी पत्रकार परिषद घेवून सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा पाढा वाचल्या नंतर गोकुळ चे अध्यक्ष विश्वास पाटील यांना खुलासा करावा लागला.