राजे बँकेच्या नवीन पाच शाखांना परवानगी द्या – केन्द्रीय अर्थ राज्यमंत्र्याकडे मागणी

कागल (प्रतिनिधी) : राजे विक्रमसिंह घाटगे बँकेने कार्यक्षेत्र विस्तार व नवीन पाच शाखा परवानगीसाठी आरबीआयकडे पाठविलेला प्रस्ताव प्रलंबित आहे.याकामी आरबीआयला सुचना करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना राजे बँकेच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे विनंती केली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांना राजे बॅंकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील, उपाध्यक्ष नंदकुमार माळकर,संचालक राजेंद्र जाधव,अप्पासाहेब भोसले व रविंद्र घोरपडे शाहूचे संचालक युवराज पाटील यांनी हे निवेदन दिले.


या निवेदनात असे म्हटले आहे,राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँकेने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे क्षेत्र विस्तारित करण्यासाठी आणि पाच नवीन शाखा उघडण्याच्या परवानगीसाठी विनंती केली आहे. आरबीआयच्या नियमांनुसार राजे बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि व्यवस्थापित बँक आहे.
बँकेने 104 वर्षे पूर्ण केली आहेत, 9 शाखा असून एकूण ठेवी सुमारे रु. 400 कोटी आणि कर्जे रु. 230 कोटी. एकूण व्यवसाय जवळपास रु. 650 कोटी आहे. निव्वळ एनपीए शून्य टक्के आहे. ढोबळ एनपीए 5% पेक्षा कमी आहे आणि ऑडिट वर्ग सतत ‘अ’आहे. 2020-21 या वर्षासाठी 15% प्रमाणे लाभांश वाटप केला आहे.


याचा विचार करून आरबीआय मुंबईला कार्यक्षेत्राच्या विस्तारासाठी आणि नवीन पाच शाखा उघडण्याच्या परवानगीसाठी योग्य सूचना द्याव्यात.अशी विनंती केली आहे.