बहिरेश्वर ते बीड शेड रस्त्यासाठी 53 लाख निधी मंजूर

बहिरेश्वर: बहिरेश्वर ते बीड शेड अंतर सर्वसाधारण दीड दोन किलोमीटर आहे. सद्य परिस्थिती पाहता बहिरेश्वर कोगे दरम्यान असणारा वाहतुकीसाठी वापरात असलेला बंधारा आज अखेरची घटका मोजत असल्याने पाटबंधारे विभागाने यावरील वाहतुकीस निर्बंध घातले आहेत परिणामी बहिरेश्वर,म्हारूळ, आमशी भागातील नागरिकांना कोल्हापूर ला जाणेसाठी जवळचा असणारा मार्ग बंद झाल्यामुळे बहिरेश्वर बीड शेड मार्गे कोल्हापूरला ये-जा करावी लागते. यामुळे या रस्त्यावर रहदारी वाढली आहे.

तीन चार वर्षांपूर्वी बहिरेश्वर ते बीड शेड रस्त्याची डागडुजी जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आली होती. कुंभी कासारी कारखान्याला ऊस वाहतूक करण्यासाठी या रस्त्याचा वापर जास्त प्रमाणात होत आहे. यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ग्रामीण भागातील महिलावर्ग गोवर्या ,(शेनि) लावण्यासाठी रस्त्यावरील साईट पट्टीचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येत आहे यामुळे सतत वाहतुकीची कोंडी होत आहे. कोंडा करण्यासाठी टाकलेल्या पाल्यावरुन (चगाळा) गाडी घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहे शिवाय कोणत्याही वाहनधारकाने शेनि वरून गाडी घातल्यानंतर त्यांना महिला वर्गातून शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे यातून सर्रास वादावादी चे प्रकार होत आहेत…यातच थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे दाट धुके व दव प्रमाण आढळून येत असल्याने रस्त्यावर गाडी घसरुन अपघात होत आहेत.या सर्वांचा विचार करून जिल्हा परिषद यांच्या वतीने बहिरेश्वर कमान ते बीडशेड एक किलोमीटर अंतरासाठी 53 लाख निधी मंजूर करण्यात आला आहे उर्वरीत 500 मीटर साठी निधी लावुन हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण केले जाईल असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य सुभाष सातपुते यांनी दिलेआहे..आताच जर काम सुरु केले तर आणखीन वाहतुकीची कोंडी होणार कारण कारखान्याची होणारी ऊस वाहतूक शिवाय के एम टी बस सेवा ,कोल्हापुर ला रोजचा प्रवास करणारा कामगार वर्ग यांची गैरसोय टाळण्यासाठी या रस्त्याचे काम कारखान्याचा गळीत हंगाम संपल्यानंतर चालु केले जाईल असे स्थानिक जि प सदस्य सुभाष सातपुते यांनी सांगितले.