पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कारासाठी राज्यात पहिल्या तीनमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या पंचायत राज सशक्तीकरण २०२२ पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या तीन जिल्हा परिषदांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. यासाठी आता पुढील आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या  अधिकाऱ्यांचे पथक विभागीय क्षेत्रीय पडताळणीसाठी कोल्हापुरात येणार आहे.

सन २०२०-२१ मधील कामकाजावर आधारित पंचायत राज सशक्तीकरण पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहेत. यासाठी राज्यपातळीवरून मूल्यांकन होऊन ही नावे केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेने आपला प्रस्ताव गुणांसह ऑनलाईन पाठवायचा होता. त्यानुसार पाठविलेल्या प्रस्तावांमधून कोल्हापूर, नागपूर आणि बुलडाणा या जिल्हा परिषदा राज्यात पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहेत.   राज्यात पहिल्या तीनमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद  : उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांनी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या असून, सादर केलेल्या प्रस्तावामध्ये जी माहिती भरली आहे, त्यानुसार ती कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.