राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त राजे बँकेमार्फत शिबिर

कागल: कागल येथील डोळे तपासणी शिबिरात 156 हून अधिक रुग्णांची तपासणी केली. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त या शिबिराचे आयोजन केले होते.

येथील श्रीराम मंदिरमधील सभागृहात शिबिर झाले. राजे बँकेचे चेअरमन एम. पी .पाटील,व्हा.चेअरमन नंदकुमार माळकर,राजेंद्र जाधव,वैद्यकीय अधिकारी एन.डी.खोत,रविंद्र कदम यांनी या शिबिराचे उद्घाटन केले. मिरज येथील लायन्स नॅबच्या तज्ञांमार्फत या रुग्णांची तपासणी केली.

दरम्यान यावेळी देहदानाचा संकल्प केलेल्या मुरलीधर सुतार या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते केला.यावेळी बँकेचे चेअरमन एम.पी.पाटील,संचालक राजेंद्र जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शाहू साखर कारखान्याचे संचालक यशवंत माने,सतिश पाटील,राजे बँकेचे संचालक आप्पासो भोसले,प्रकाश पाटील,उमेश सावंत एस.डी.पाटील,उमेश सावंत,कल्पना घाटगे,माजी संचालक इब्राहिम आलासकर,विजय बोंगाळे,रमेश सणगर आदी उपस्थित होते.स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक चव्हाण यांनी केले.व्हा.चेअरमन नंदकुमार माळकर यांनी आभार मानले.