पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा व मारण्याची धमकी देणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवा नवा मोंढा पोलिस ठिय्या आंदोलन केले.
भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात प्रदेश कार्यकारीणी सदस्य संजय शेळके, मोहन कुलकर्णी, मनपाच्या गटनेत्या मंगल मुदगलकर, नगरसेवक मोकिंद खिल्लारे, सरचिटणीस संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर, एस. एस. ईनामदार, अंकुश अवरगंड, अब्दुल खालेद, संतोष जाधव, रामदास पवार, उमेश शेळके, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी, रोहीत जगदाळे, युवती मोर्चा संयोजिका गिता सुर्यवंशी, संजय जोशी, अरूण कदम, संदीप शिंदे आदी सहभागी झाले होते.