कोल्हापूर : शेतकरी आणि पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचे साेमवारी (दि.१७) निधन झाले. आज सकाळी राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजमध्ये त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. कसबा बावड्यातील स्मशानभूमीत आज दीड वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते आणि नागरिकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर कसबा बावडा येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.