सरनोबतवाडी ओढा स्वच्छ करण्याची भाजपा ओबीसी आघाडीची मागणी

कोल्हापूर – सरनोबतवाडी येथील ओढा अत्यंत बिकट अवस्थेत आहे .पडझड झाल्याने यातील दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे .याची पडझड रोखावी आणि हा ओढा स्वच्छ करून घ्यावा ,अन्यथा तीव्र आंदोलन करु असा इशारा सरनोबतवाडी ग्रामस्थानी दिला आहे.

तशा आशयाचे निवेदन भाजपा ओबीसी आघाडीच्या वतीने ग्रामविकास अधिकारी भरत सातपुते याना देण्यात आले. आघाडीचे कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य रूपेश परीट यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण शिंदे, अक्षय माने, प्रवीण रोडगे, मनोज व्हनकडे, अंजुम शेख यांचा यामध्ये समावेश होता.