बोर्डाच्या परीक्षा यंदा ऑफलाईनच: शिक्षण मंडळाची निश्चिती

औरंगाबाद – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा परीक्षा ऑफलाईन घेण्याचे निश्चित केले आहे. ऑफलाईन परीक्षेसाठी मंडळाकडून सध्या तयारी सुरु केली आहे.परीक्षेसंदर्भात मंडळाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.विभागात बारावीसाठी 412; तर दहावीसाठी 629 केंद्रांची निश्चिती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी परीक्षेसाठी विभागातून 1 लाख 79 हजार 486 तर बारावी परीक्षेसाठी 1 लाख 64 हजार 333 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. राज्य मंडळ लेखी-ऑफलाईन 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर अद्याप ठाम असून त्यात कोणताही बदल न झाल्याने विभागीय मंडळांनी केंद्र निश्चिती, परीक्षेच्या तयारीवर भर दिलेला आहे.औरंगाबाद, बीड, जालना, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत दहावीसाठी 629 तर बारावीसाठी 412 परीक्षा केंद्रांवर होईल. आजपर्यंत राज्यमंडळाचे अजून कुठलेही नवे निर्देश नाहीत. त्यामुळे परीक्षेचे कामकाज सुरळीत सुरू आहे. असे विभागीय सचिव आर. पी. पाटील यांनी सांगीतले.