जिल्ह्यातील शाळा सुरु ठेवल्यास कडक कारवाई होणार….

कोल्हापूर : फेब्रुवारी 2022 अखेर कोरोनाची लाट ओसरेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, कोरोना रुग्णसंख्या वाढू नये यासाठी राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनूसार शाळा चालकांनी थोडा संयम ठेवावा आणि 15 फेब्रुवारीपर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा व कॉलेज बंद ठेवावीत. जी शाळा बंद केली जाणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अशा इशारा पालकमंत्र्यांनी दिला.

तसेच, गायरान जमिनीत क्रीडांगण करण्यासाठी मागणी होत असल्यास त्यांना मंजूरी दिली जात आहे. सध्या आलेल्या प्रस्तावांपैकी कोणताही प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर एकही प्रस्ताव प्रलंबित नाहीत. सध्या क्रिडांगणांची मागणी वाढली आहे. 2022-23च्या अनुदानासाठी क्रिडांगण अनुदानात वाढीव मागणी करणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

म्हणाले, क्रीडा संकुलासाठी पहिला निधी आला. त्याची कामे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, राज्य शासनाने 25 ऐवजी 50 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी मार्च मध्ये यईल त्यानंतर पुढील कामे गतीने करता येतील. जिल्हा क्रिडा संकूल दहा एकरात करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करुन पाठवला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऑक्‍सिजन प्रकल्प उभारली आहे. सध्या दवाखान्यात ऍडमिट होताना दिसत नाहीत. याचा अर्थ भविष्यात होणार नाहीत, असे नाही. याचीही तयारी केली आहे. पण जिल्ह्यात लसच कवच कुंडल आहे. हे लक्षात घेवून पहिला डोस ज्यांनी घेतलेला नाही. त्यांना लसी दिली जाणार आहे.