कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक दक्षता डोस देण्याच्या मोहिमेला प्रारंभ झाला. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिस मुख्यालयाजवळील अलंकार हॉल येथे मोहिमेचे उद्घाटन झाले. एका दिवसात जिल्ह्यातील एक हजार ५२० जणांचे लसीकरण झाले.
यात ६१० आरोग्यसेवक, ३७२ फ्रंटलाईन वर्कर आणि ५३८ व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला. शहरातील ५०९ जणांचा समावेश आहे. या वेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, की बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली असून जिल्ह्यात ६८ हजार लाभार्थी अपेक्षीत आहे. यात १७ हजार लाभार्थी शहरातील आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून शासनाने ही तयारी सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर, फ्रंटलाईन वर्कर आणि व्याधीग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना दक्षता डोस देण्यात येणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. नागरिकही स्वत: पुढाकार घेऊन लसीकरण करुन घेत आहेत. पोलिसांसह सर्व फ्रंन्टलाईन वर्कर्संना बुस्टर डोस देण्याचा प्रयत्न आहे.