साताऱ्यात कोयना धरण परिसरात बसले भूकंपाचे हादरे….

सातारा : सातारा जिल्ह्यातून एक वाईट बातमी समोर आली आहे. कोयना धरण परिसरात भूकंपाचे हादरे बसले आहेत. पण हा भूकंप सौम्य स्वरुपाचा असल्याने कोणतीही वित्त आणि जिवीतहानी झालेली नाही.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी होती. सुदैवाने भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कोयना धरण परिसरात आज दुपारी जवळपास सव्वा दोन वाजेच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिदू हेळवाक गावच्या नैऋतेस सहा किमी अंतरावर होतं.कोयनेपासून हे केंद्रबिंदू आठ किमी इतक्या अंतरावर आहे. या केंद्रबिंदूची खोली चार किमी डेप्थ आहे. आधी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना ओमिक्रॉनची लागण होऊ शकते का? WHOने दिलं उत्तर राज्यावर असमानी संकट, मुसळधार पावसासह पुन्हा गारपीटची शक्यता राज्यावर कोरोनाचं संकट असताना आसमानी संकटांनीदेखील नागरीक हतबल झाले आहेत.