क्रिडाई -केडीएम ग्रुपकडून महानगरपालिकेस अत्याधुनिक बोट

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रिडाई व केडीएम ग्रुपतर्फे महानगरपालिकेस अत्याधुनिक यांत्रिकी बोट ओ.बी.एम. इंजिन, लाईफ जॅकेट देण्यात आले. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्याकडे ही बोट सुपूर्द करण्यात आली.

कोल्हापूरमध्ये येणाऱ्या आपत्कालीन पूरस्थितीत नागरिकांच्या बचावासाठी ही बोट उपयोगी पडणार आहे. ही यांत्रिकी बोट ८ लाखांची असून या बोटीबरोबर ओबीएम इंजिन, लाईफ जॅकेट सुपूर्द करण्यात आले.

यावेळी क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष विद्यानंत बेडेकर, क्रिडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष राजू परीख, महेश यादव, ज्येष्ठ सभासद कृष्णा पाटील, प्रदीप भारमार, गौतम परमार, श्रीधर कुलकर्णी, श्रेयांस मगदूम, संदीप मिरजकर, अजय डोईजड, महेश पोवार, लक्ष्मीकांत चौगुले, माजी उपमहापौर संजय मोहिते, अर्जुन माने, काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन चव्हाण, माजी गटनेता शारंगधर देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, सचिन पाटील, आदिल फरास, मधुकर रामाने, राहुल माने, शिवानंद बनछोडे, आशपाक आजरेकर आदी उपस्थित होते.