अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाचा ‘हा’ नवा रेकॉर्ड !

मुंबई वृत्तसंस्था : सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा द राइज’ या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरात जवळपास ३०० कोटी रुपयांची कमाई करत नवा रेकॉर्ड केला आहे. भारतात या चित्रपटाने २०० कोटींची कमाई केली आहे.‘पुष्पा’ चित्रपटाच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या कमाई बाबत माहिती देण्यात आली आहे.

‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

 ‘पुष्पा’ हा चित्रपट १७ डिसेंबर २०२१मध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार समांथा रुथ प्रभूने आटम सॉंग देखील केले आहे. ‘पुष्पा’ हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित झाला असून चित्रपटाने जवळपास २३.२३ कोटी रुपये कमावले आहेत.