पालकमंत्री सतेज पाटील यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड !

कोल्हापूर (प्रतिनिधी ): विधानपरिषदेत बिनविरोध आमदार, जिल्हा बँकेत बिनविरोध संचालकपदी निवड झाल्यानंतर गृहराज्यमंत्री व पालकमंत्री सतेज पाटील यांची येथील डी.वाय.पाटील साखर कारखानाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.

असळज (ता.गगनबावडा ) येथील डी.वाय.पाटील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यातही पालकमंत्री सतेज पाटील यांना यश आले आहे. निवडणुकीसाठी अर्ज छाननीनंतर २१ जागांसाठी २१ अर्जच शिल्लक राहिले. बिनविरोधची अधिकृत घोषणा १७ जानेवारीला होणार आहे.डी. वाय.पाटील साखर कारखान्याच्या संचालक मंडळात  पालकमंत्री सतेज पाटील, डी.वाय.पाटील ग्रुपचे अध्यक्ष संजय पाटील यांच्यासह २१ जणांचा समावेश आहे