वर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

मुंबई : वर्षाच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत पण आजही त्यात कोणताही बदल झालेला नाही. आजही इंधनासाठी सामान्यांना तेवढीच किंमत मोजावी लागणार आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीच बदल झालेला नाही. मुंबईत पेट्रोलचा भाव 109.98 रुपये तर डिझेलचा भाव 94.14 रुपये प्रति लीटर आहे. महाराष्ट्रातील इतर शहरात काही पैशांनी इंधनाचे दर बदलले आहेत, अर्थात त्यात फार मोठा बदल झालेला नाही. दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते