वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट; १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवाखंड कालावधी क्षमापित पत्रांचे वितरण

मुंबई:आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील १९५ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड कालावधी क्षमापित’ पत्रांचे वितरण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. गेली २० वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा…

मानवतेच्या मार्गावर चालण्यासाठी कृतीतून संकल्प करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मुंबई : शीख पंथीयांचे दहावे गुरू श्री गुरु गोविंद सिंगजी यांचे सुपुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग (वय ९ वर्षे) आणि साहिबजादे बाबा फतेह सिंग (वय ७ वर्षे) यांच्या अद्वितीय शौर्य…

जिल्हा नियोजन समिती (DPDC) निधीतून राज्य राखीव पोलीस बलाला ६ शासकीय वाहनांची भेट

कोल्हापूर:राज्याचे पोलीस खाते हे सदैव जनतेच्या सुरक्षिततेसाठी तत्पर असते. कोल्हापूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे काम आपले पोलीस अधिकारी व अंमलदार दिवसरात्र करत असतात. विशेषतः बंदोबस्त, आपत्कालीन परिस्थिती, नैसर्गिक…

दृष्टिबाधित टी-20 क्रिकेट विश्वविजेत्या महिला संघातील खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

मुंबई : भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-20 क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीममधील खेळाडूंचा सत्कार केला. महिला खेळाडूंना त्यांच्या सरावात येणाऱ्या अडचणी दूर…

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी…

डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डच परराष्ट्र मंत्री डेव्हिड वील यांनी भेट घेतली. ‘वर्षा’ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीत उद्योग विभाग सचिव पी. अनबलगन, सचिव आणि राजशिष्टाचार विभागाचे प्रमुख डॉ. राजेश…

युनेस्कोतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरणाबद्दल राजदूत विशाल शर्मांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

मुंबई:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात उभारणे ही गौरवाची, ऐतिहासिक आणि जागतिक स्तरावर महत्त्वाची घटना आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवाधिकारांचे जागतिक प्रवक्ते म्हणून…

शक्तीपीठ महामार्ग विरोधात एक जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिना दिवशी एक जुलैला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आज गुरुवारी ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शक्तीपीठ विरोधात एक जुलैला सर्व…

शक्तीपीठ महामार्गावरून आमदार सतेज पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल..

कोल्हापूर : विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी, शक्तीपीठ महामार्गावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला. महाविकास आघाडी म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. मंत्री हसन…

कोल्हापूरी चप्पलच्या रक्षणासाठी कृष्णराज महाडिक यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, इटलीतील फॅशन शो मध्ये विनापरवाना कोल्हापूरी चप्पलची नक्कल केल्याबद्दल कारवाई मागणी

कोल्हापूर:कोल्हापूरी चप्पलची परस्पर नक्कल होवू नये आणि स्थानिक चर्मकार कारागिरांच्या हक्कांवर गदा येवू नये, यासाठी आज युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. इटलीतील मिलान शहरातील एका फॅशन शो मध्ये, प्राडा या आंतरराष्ट्रीय कंपनीने थेट कोल्हापूरी चप्पलची हुबेहुब डिझाईनची कॉपी केली आहे. वास्तविक २०१९ मध्येच भारत सरकारने कोल्हापूरी चप्पलला जिआय टॅग दिला आहे. त्यामुळे प्राडा कंपनीकडून कोल्हापूर चप्पलची कॉपी करून, स्थानिक कारागिरांवर अन्याय केला जातोय, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी लक्ष घालावे, अशी विनंती कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. २३ जूनला इटलीमध्ये झालेल्या एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर करण्यात आला. कोल्हापूरच्या चर्मकार कारागिरांसाठी हा एक सुखद धक्का होता. मात्र फॅशन शो आयोजकांनी कोल्हापूरी चप्पलचा असल्याचा कुठेही उल्लेख केला नाही किंवा प्रदर्शनासाठी कायदेशीर परवानगी घेतली नाही. वास्तविक २०१९ मध्येच कोल्हापूरी चप्पलला  जिओ टॅगींग करून, एकप्रकारे कोल्हापूरी चप्पल बॅ्रँडचे आंतरराष्ट्रीय रजिस्ट्रेशन झाले आहे. अशा परिस्थितीत आज कोल्हापुरातील काही चर्मकार कारागिरांना घेवून, युवा नेते कृष्णराज महाडिक  यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूरी चप्पल ही कोल्हापूरची आणि महाराष्ट्राची ओळख आहे. या चप्पलला भारत सरकारनं जिआय टॅग दिल्याने, त्याचे उत्पादन ठराविक क्षेत्रात नोंदणीकृत कारागिरांकडूनच होवू शकते. अशा परिस्थितीत प्राडा या कंपनीने इटलीतील फॅशन शो मध्ये कोल्हापूरी चप्पल सारखीच हुबेहुब डिझाईनची चप्पल सादर केली आणि  त्याचा मुळ उगम किंवा कारागिरांचा कसलाही उल्लेख केला नाही. त्यातून स्थानिक कारागिरांच्या हक्कांवर गदा आल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांसमोर करण्यात आली. कृष्णराज महाडिक यांनी या विषयाचे महत्व आणि गांभीर्य मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर मांडले. अशा पध्दतीने कोल्हापूरी चप्पलच्या कायदेशीर आणि मुलभूत हक्कांवर गदा येत असल्याबद्दल महाराष्ट्र सरकारने तातडीने केंद्र सरकार मार्फत कायदेशीर कारवाईसाठी पावलं उचलावीत आणि कोल्हापूरी चर्मकार बांधवांना न्याय द्यावा, अशी मागणी कृष्णराज महाडिक यांनी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने याप्रश्‍नी  कायदेशीर पावले उचलणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या विशेष कार्यकारी अधिकार्‍यांना याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी काय करता येईल, याबाबत माहिती घेण्यास सांगितले. कृष्णराज महाडिक यांनी, कोल्हापूरच्या चप्पल कारागिरांना सोबत घेवून, या महत्वाच्या विषयावर थेट भुमिका मांडली. त्याबद्दल कोल्हापुरातील चर्मकार बांधवांनी कृष्णराज महाडिक यांचे आभार मानले आहेत.    

🤙 8080365706