कोल्हापुरात श्रावण व्रत वैकल्य उत्साहात: नष्टे लॉनवर 108 जोडप्यांचे सामुदायिक उपवास सोडणे, पाच हजार भाविकांची उपस्थिती

कोल्हापूर:हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त कोल्हापुरातील समस्त हिंदुत्ववादी संघटना व आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने नष्टे लॉन, कोल्हापूर येथे *”श्रावण व्रत वैकल्य”* या सामुदायिक उपवास सोडण्याच्या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पॉप

 

 

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी जेष्ठ हिंदुत्ववादी आणि शिवसैनिक कमलाकर किलकिले यांनी पंचगंगा नदी तीरावरून कावडीने आणलेल्या पवित्र जलाने झाली. या जलाचे कार्यक्रमस्थळी सवाद्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर या जलाने श्री महादेवाच्या पिंडीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस जलाभिषेक करण्यात आला. यानंतर गोमाता पूजन आणि ध्वजवंदन करण्यात आले.

 

त्यानंतर अकरा नवदाम्पत्यांच्या उपस्थितीत महायज्ञाला सुरुवात झाली. या यज्ञासाठी हिंदू धर्मातील विविध जाती-पंथातील मान्यवर यजमान म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिंदू देवतांचे पूजन आणि आरती करण्यात आली. तसेच भारतमातेची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी “वंदे मातरम्”, “भारत माता की जय”, “हिंदू धर्म की जय” अशा जयघोषांनी परिसर दुमदुमला.

 

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे एकाच वेळी 108 जोडप्यांनी केळीच्या पानावर मंत्रघोषात सात्विक भोजनाद्वारे आपला उपवास सोडला. या कार्यक्रमाचा सुमारे पाच हजार हिंदू बांधवांनी लाभ घेतला. यावेळी इस्कॉन भजनी मंडळाच्या जप आणि भजनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

 

कार्यक्रमस्थळी भगवान श्रीकृष्ण, भारतमाता, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह अनेक देवतांच्या प्रतिकृतींचे पूजन करण्यात आले. भोजन मंडपामध्ये हिंदू धर्माचे मार्गदर्शनपर बोधवाक्यांचे फलक लावण्यात आले होते.

 

या संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य कोल्हापूर ब्राह्मण पुरोहित संघाने केले.

🤙 8080365706