कोल्हापूर :राज्य गुणवंत कामगार असोसिएशन व जागृती नागरी सेवा संस्थेच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कोल्हापुरात आ . सतेज पाटील यांच्या हस्ते पार पडला. सुरेश केसरकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नव्या पिढीची आव्हाने वेगळी असल्याने जुन्या पिढीने तुलना न करता योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.. सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांचा संयम कमी होत त्यामुळे, त्यांनी इंटरनेटचा वापर आत्मविकासासाठी आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्यासाठी करावा, असे आवाहन यावेळी केले.
यावेळी अनिल म्हमाणे, संदीप जंगम, अतुल बांदिवडेकर, संघराज जगतकार, सतीश मुसळे, सचिन खराडे, संजय सासणे, भगवान माने, अनिता काळे, संभाजी थोरात, महादेव चक्के, शिवाजी चौगले, सुभाष पाटील, रघुनाथ मुधाळे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.
