‘कॅप’ ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवारी डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये मार्गदर्शन

कोल्हापूर:डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी या अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्थेच्यावतीने अभियांत्रिकीसाठीची केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी (कॅप) ऑप्शन फॉर्म भरण्याबाबत मंगळवार , दि. २८ जुलै रोजी मार्गदर्शनपर सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता होणाऱ्या या सेमिनारमध्ये ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता मार्गदर्शन करणार आहेत. 

 

 

प्रवेश प्रक्रिया फेऱ्यांमध्ये झालेला बदल , ऑप्शन फॉर्म भरण्यापूर्वीची तयारी ऑप्शन फॉर्म भरताना होणाऱ्या सर्वसाधारण चुका, कट-ऑफचे विश्लेषण, गुणवत्तेनुसार योग्य शाखा व महाविद्यालयाची निवड, अलॉटमेन्टचे टप्पे व नियम, नवी शुल्क पद्धती, तसेच प्रवेश निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती या सेमिनारात दिली जाणार आहे.

 

ऑप्शन फॉर्म अचूकपणे भरणे ही अभियांत्रिकी प्रवेशाची अत्यंत महत्वाची पायरी आहे. हा फॉर्म भरताना कोणत्याही चुका होऊ नयेत यासाठी हे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या शंकांचेही निरसन केले जाणार आहे

 

संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. अभियंता बनण्याचा मार्ग अधिक सुकर करण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी या मार्गदर्शनपर सेमिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे तसेच ॲडमिशन हेड प्रा. आर. जी. बेन्नी यांनी केले आहे.

🤙 8080365706