कोल्हापूर: सर्वसामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे प्रश्न सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने मार्गी लागावेत यासाठी आज शिवाजी पार्क परिसरात ‘बी-टेन्युअर मुक्त शिवाजी पार्क विशेष कॅम्प’ आयोजित करण्यात आला. या कॅम्पला आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला.

नगरसेविका . वंदना मोहिते आणि शिवसेना उपशहरप्रमुख विश्वजित मोहिते यांच्या पुढाकारातून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.
कॅम्पमध्ये बी-टेन्युअर जमिनींसंदर्भातील आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, शासनाच्या नियमावली तसेच नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी नागरिकांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या अडचणी मांडल्या. यावेळी आ. राजेश क्षीरसागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांच्या प्रकरणांचा तत्परतेने पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
या विशेष कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी नगरसेवक प्रमोद देसाई, भूषण पाटील, सत्यजीत कापडे, नितीन आडके, समरजीत मोहिते, शिवसेना उपशहर प्रमुख मुकुंद सावंत, विभाग प्रमुख संदीप चिगरे, विपुल भंडारे, सतीश भोसले, विद्येश नाईक, रवी तेग्गीनमणी, नितीन कराडे, सुभाष भुरके, सुनील बुकशेट, जयकुमार बुकशेट, संजय नलावडे, नितीन सारडा, रियाज लाड, वैष्णव गवळी, आदित्य शिंदे, शहर भूमापन अधिकारी शशिकांत पाटील, ग्राम महसूल अधिकारी कुलदीप माने, समीर पाटील, समीर गांधी उपस्थित होते.
