पायी चालणाऱ्या दिंडीत ट्रक शिरला; 3 वारकरी महिलांचा मृत्यू

मुंबई:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राष्ट्रीय महामार्गावर सासवड – जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा येथे पायी चालणाऱ्या वैष्णवांच्या दिंडीत वारकऱ्यांचे साहित्य वाहून नेणारा ट्रक शिरला.

 

 

यामध्ये १० ते १५ वारकऱ्यांना धडक बसली असून तीन वारकरी महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सुमारे ७ जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. जखमींवर येथील खाजगी व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. याप्रसंगी बुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करून मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी एक्स पोस्टमध्ये लिहिले- पुणे जिल्ह्यातील जेजुरीजवळ झालेल्या अपघातात ३वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातातील जखमी वारकऱ्यांना तातडीने  जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मिळताच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्वरित घटनास्थळी रवाना झाले असून संपूर्ण परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून आहोत. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ₹५ लाखांची आर्थिक मदत दिली जाईल.

 

 

🤙 8080365706