कागल :राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने कागल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

वाढदिवस साजरा करताना अनावश्यक खर्च टाळून सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले होते. त्यानुसार हा उपक्रम उत्साहात पार पडला.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमातून रुग्णांना फळांचे वितरण करून मंत्री पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत भाजप कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला.
यावेळी नगरसेवक दिपक मगर, सुशांत कालेकर, बाळासाहेब माळी, राजेंद्र जाधव, प्रमोद कदम, गजानन माने, सज्जन पोवार, रोहित मोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
