मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू ग्रुपकडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन कागल,मुरगूड व गडहिंग्लजसह उत्तूरमध्ये राबविणार विविध उपक्रम

कागल:उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाहू ग्रुपच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

मंत्री पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले होते.त्यानुसार आयोजित उपक्रमांमधून शेतकरी, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आरोग्य व आर्थिक सहाय्याची महत्त्वपूर्ण सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

शुक्रवारी (ता. १२) रोजी कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत ‘श्री छत्रपती शाहू ठिबक सिंचन योजना’ अंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज मंजुरी पत्रांचे वितरण तसेच मागासवर्गीय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात येणार आहेत. हा संयुक्त कार्यक्रम कारखाना प्रधान कार्यालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते हे वाटप केले जाणार आहे.

 

दरम्यान, बुधवारी (ता. १०) मुरगूड (ता. कागल) येथे राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑपरेटिव्ह बँक व राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात हृदयविकार, मूत्रविकार, स्त्रीरोग, अस्थिविकार, नेत्र तपासणी, मेंदूविकार यांसह सर्वसाधारण आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत.

याशिवाय रक्तदाब, ईसीजी आणि शुगर तपासणी मोफत केली जाणार असून, अँजिओग्राफी, टीएमटी व 2D इको तपासण्या सवलतीच्या दरात उपलब्ध असतील. नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत रक्त तपासणी व आवश्यक शस्त्रक्रिया उपचारांची सुविधा देखील देण्यात येणार आहे.

या शिबिरात अथायु, आकाशदीप, कोल्हापूर कॅन्सर सेंटर, ग्रामीण रुग्णालय मुरगूड तसेच संकल्पसिद्धी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कागल येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे. हे शिबिर ग्रामीण रुग्णालय, मुरगूड येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत होणार आहे.याच दिवशी गडहिंग्लज येथे उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत.तर उत्तूर (ता.आजरा) येथे हनुमान मंदिर, नेहरू चौक येथे सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

🤙 8080365706