कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच सह-पालकमंत्री मा. माधुरीताई मिसाळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ताराराणी सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर संपन्न झाली. 

 

 

 

बैठकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध विकासकामे, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, रस्ते, कृषी, ग्रामीण विकास तसेच शहरी भागातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

 

कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणाऱ्या विकासकामांना प्राधान्य देण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रलंबित प्रश्न, विकास प्रकल्प आणि आगामी नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णयांवर विचारविनिमय करण्यात आला.

 

यावेळी खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

🤙 8080365706