कोल्हापूर:छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराप्रमाणे सर्वांना सोबत घेवून जाण्याची काँग्रेसची पहिल्यापासून भूमिका आहे.आम.सतेज पाटील देखील नेहमी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहेत.मात्र भाजप धर्मावर आधारित राजकारण करत आहे, पण धर्मावर राजकारण करणाऱ्या भाजपला प्रभू रामचंद्र देखील माफ करणार नाही.असा टोला युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू बीच यांनी लगावलाय. काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित केलेल्या वह्या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेली सतरा वर्षे अखंडपणे शुभेच्छा स्वरूपात वह्या स्वीकारला जातात.या वह्या जिल्ह्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येतात.गेल्या 17 वर्षात जवळपास 76 लाख वह्यांचे वाटप करण्यात आल.यावर्षी देखील आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साडेसहा लाखाहून अधिक वह्या संकलित झाल्या होत्या. आज जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त संकलित केलेल्या वह्यांचा वाटप कार्यक्रम प्राथमिक स्वरूपात संपन्न झाला.या कार्यक्रमाला युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू बीच यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला नगरसेविका धनश्री कोरवी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केल.यानंतर सर्व संयोजकांच्या वतीन मान्यवरांचे खादी स्कार्फ
घालून स्वागत करण्यात आलं.यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आलं. यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त
संजय गांधी निराधार ,श्रावण बाळ आणि दिव्यांग पेन्शन योजनेच्या लाभार्थींना मंजूर पत्रांचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल.यावेळी बोलताना उदय भानू चीब यांनी आमदार सतेज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त वह्या संकलित करून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वाटण्याचा स्तुत्य उपक्रम राबवल्या बद्दल पाटील यांचं कौतुक केलं.समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळाले पाहिजेत त्याला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ही काँग्रेसची विचारधारा आहे आणि आमदार सतेज पाटील त्याप्रमाणेच काम करत आहेत.एकीकडे पेपर फुटी सारख्या घटना घडत आहेत.
भ्रष्टाचार वाढलाय. महागाई वाढत आहे, अशा परिस्थितीत भाजप मात्र सरकार बनवण्यात व्यस्त आहे. भाजप केवळ धर्माच्या आधारावर राजकारण करत आहे. मात्र धर्माच्या आधारावर राजकारण करणाऱ्या भाजपला साक्षात प्रभू रामचंद्र देखील माफ करणार नाही.असा टोला उदय भानू बिच यांनी लगावलाय.
यावेळी बोलताना युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या वह्या संकलनाच्या उपक्रमाची नोंद “लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये झालीय.त्या उपक्रमाला उपस्थिती लावण्याचा भाग्य आपल्याला लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केलं.
सतेज पाटील यांचं नेतृत्व हे राज्यातील आश्वासक नेतृत्व आहे.त्यामुळं एखाद्या देवाच्या जत्रेला गर्दी होणार नाही एवढी गर्दी आम् सतेज पाटील यांच्या कार्यक्रमाला होत असते.राजकारणात चढउतार येत असतात पण त्यात देखील लोकप्रियता मिळवलेला आश्वासक चेहरा हीच सतेज पाटील यांची ओळख असल्याचे सांगितल.
यावेळी आमदार सतेज पाटील यांनी बोलताना आपला उद्देश आणि विचार चांगला असेल तर लोकदेखील विश्वासाने आपल्या पाठीशी राहतात आणि मदत करतात हे आपण वह्या संकलनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून पाहिलंय.छत्रपती शाहू महाराजांचा शिक्षणाचा आणि समतेचा विचार घेऊन जाणारा मी कार्यकर्ता आहे. हे कोल्हापूर म्हणजे छत्रपती शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे.आपला विचार सोडून जायचं नाही हाच आमचा कोल्हापूरकरांचा इतिहास असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितल.
यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज,आमदार जयंत आसगावकर, गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी देखील मनोगत व्यक्त केलीत. या कार्यक्रमाला
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अजय छिकारा, प्रभारी नवज्योतसिंग संधू ,सचिव शांभवी शुक्ला,
संजय कांबळे,राजू लाटकर इंद्रजीत बोंद्रे एकनाथ पाटील आर. वाय.पाटील, छाया देसाई, सूर्यकांत पाटील,बाळासाहेब सरनाईक,सरलाताई पाटील,भारती पोवार, उदयानी देवी साळुंखे,उदय पोवार,वैभव तहसीलदार आदी उपस्थित होते.
