कोल्हापूर:कोल्हापूरातील मंगळवार पेठ येथीलk साई स्पर्श हॉस्पिटल परिसरातील गटर्स व रस्ता कामाचा शुभारंभ आज शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी नगरसेविका माधुरी नकाते व निलांबरी साळोखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून, तसेच शिवसेना उपनेत्या व मा. आमदार जयश्री चंद्रकांत जाधव व कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या विकासकामासाठी निधी मंजूर झाला आहे.
रस्ता आणि गटर्स या दोन्ही कामांमुळे परिसर अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुकर होणार असून “विकासासाठी कटिबद्ध नेतृत्व” याची पुन्हा एकदा प्रचिती नागरिकांना आली.
यावेळी किरण नकाते, गिरीश साळोखे, सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक, क्रांती पाटील, निलेश गायकवाड, अवधूत घाटगे, विकास शिरगावे, किरण पाटील, तुकाराम माळी, तालीम मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, किरण अतिग्रे, पाटाकडील तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, अरुण माळी, राजू पवार, प्रकाश माळी, सुरेखा माळी, बाळू माळी, सुनील ठोंबरे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
