कोल्हापूर:महाराष्ट्र शासन ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील दिनांक 15 मे 2014 च्या शासन निर्णया नुसार जिल्हा परिषद कोल्हापूर कडील जिल्हास्तरावरील सामान्य प्रशासन, वित्त, महिला व बाल कल्याण विभाग, पशुसंवर्धन या विभागाकडील बदली प्रक्रीया दिनांक 21/05/2026 रोजी करणेत आली. सदर बदली प्रकिया राबविताना जनगणना अधिनियम, 1948 आणि जनगणना नियम, 1990 अंतर्गत वैधानिक कर्तव्ये सुरळीतपणे पार पाडण्याकरीता जनगणनेच्या कामाशी संबंधित जिल्हा परिषदेतील गट-क व गट -ड संवर्गातील (जिल्हा परिषदांमधील सर्व शिक्षकांसह) कर्मचाऱ्यांची सन 2026 ची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे सदर निर्णया नुसार जिल्हा परिषद कोल्हापूर कडील प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या करणेत आलेल्या आहेत.

• सामान्य प्रशासन विभागाकडील विनंती बदली 2 आपसी बदली 2 एकुण 4
• वित्त विभागाकडील सहा लेखाधिकारी सर्व पदे भरलेने एकही बदली झाली नाही
• महिला बाल कल्याण विभागकडील विनंती बदली 4 आपसी 1 एकुण 5
• पशुसंवर्धन विभागाकडील प्रशासकीय बदली 2 विनंती बदली 1 एकुण 3
वरील प्रमाणे दिनांक 21/5/2026 रोजीची बदली प्रक्रिया पुर्ण झाली. यामध्ये एकुण 11 इतक्या बदल्या झाल्या आहेत. सदर बदली प्रक्रियेमध्ये डॉ जॅसमिन, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प कोल्हापूर, मा.श्री.तानाजी पाटील, उपाध्यक्ष, जिल्हा परिष्द कोल्हापूर, श्री.ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि), श्री आतुल आकुर्डे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, श्री.नितीन मस्के, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, श्री प्रमोद बाबर, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी व बदली पात्र कर्मचारी इ. उपस्थती होते. बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना दि 31 मे 2025 रोजी कार्यमुक्त केले जाणार आहे. तसेच दिनांक 22/05/2026 रोजी बांधकाम विभागाकडील बदली प्रक्रिया पुर्ण होणार आहे. तसेच दिनांक 27/05/2026 रोजी आरोग्य विभागाकडील बदली प्रक्रिया राबविणेत येणार आहे.
